in

Cyclone Tauktae : गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १ हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा; महाराष्ट्राकडे साफ दुर्लक्ष

गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळला तौक्ते चक्रीवादळाता तडाखा बसल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातधल्या वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या पाहणीनंतर गुजरातमधल्या वादळग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे.महाराष्ट्राच्या वाट्याला मदत तर सोडाच नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुद्धा केली नसल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

तौते चक्रीवादळाचा गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या वादळग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. याशिवाय देशभरात तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीचा ताळेबंद लावण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तौक्ते वादळाच्या तडाख्यानंतरही कोकणातली परिस्थिती जैसे थेच; तुफान पावसामुळे अनेक संसार पाण्याखाली

‘तौत्के’ चक्रीवादळाचा बेस्टलाही फटका; 122 गाड्यांमध्ये बिघाड, तर 52 पथदिवे पडले….