in ,

CSK vs PBKS : चेन्नईसमोर 107 धावांचे आव्हान

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जने 8 विकेट 106 धावापर्यत मजल मारली आहे. शाहरुख खान 47 धावांच्या बळावर पंजाबला इतकी धावसंख्या गाठता आली. तर सलामीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. आता चेन्नईसमोर 107 धावांचे आव्हान असणार आहे.

धोनीने सामन्याचे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजीस उतरावे लागले. मात्र पंजाबची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. मंयक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली. मात्र, दीपक चहरने टाकलेल्या पहिल्याच षटकात मयंकची दांडी गुल झाली. त्याला भोपळाही फोडता आला नाही. लोकेश राहुल 5, मयंक अग्रवाल 0 , जाय रिचर्डसन 15, मुरुगन अश्विन 6, निकोलस पुरन व दीपक हूडा 0, क्रिस गेल 10, मोहम्मद शमीने 8 धावा केल्या. शाहरुख खान या एकमेव खेळाडूने सर्वाधिक 47 धावा केल्या. या धावांसह पंजाब किंग्जने 106 धावा उभारल्या. आता चेन्नईसमोर 107 धावांचे आव्हान असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Citi Bank | चार हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार; सिटी बँक भारतातून गाशा गुंडाळणार

आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच उशीरा बेड मिळाल्याने गर्भवतीचा मृत्यू