in ,

खाकी वर्दीला कोरोनाचा विळखा; परभणीत 112 पोलिसांना कोरोनाची लागण

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून बुधवारी एका दिवसात तब्बल 1172 कोरोना बाधित रुगण आढळून आले आहेत. तर 20 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोना विरूध्दच्या सुरू असलेल्या या लढाईत अहोरात्र परिश्रम करणार्‍या पोलिस दलातील अधिकारी – कर्मचार्‍यांना ही आता या कोरोनाच्या विळख्याने आपल्या तावडीत घेतले आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल 112 पोलीस अधिकारी – कर्मचारी कोरोनाची लागण झाली असून, काहींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर काहीजण होम कोरंटाइन आहेत.

यामध्ये 16 अधिकारी, तर 86 पोलिस कर्मचारी आणि 10 होमगार्डचा समावेश आहे. जिल्हा पोलिस दलातील दोन कर्मचार्‍यांचा काल कोरोनाने मृत्यू ही झालाय . त्यामुळे पोलिस दल हादरले आहे. एकीकडे अधिकारी – कर्मचारी योध्दे एकापाठोपाठ एक घायाळ होत आहेत. त्यातच ही संख्यासुध्दा चिंता करणारी ठरली आहे . आतापर्यंत सहा कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown | गर्दी झाल्यास बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवाही होणार बंद!

‘महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात मराठी उमेदवारांविरोधात प्रचाराची बेईमानी करू नये’