in

गजा मारणेच्या टोळीशी संबंध; १४ जण अटकेत

सातारा जिल्ह्यात वसुलीसाठी प्रवेश केलेल्या 14 जणांना वाई पोलीसांनी अटक केली आहे. या टोळीतील काही लोकांचा गजा मारणे टोळीशी देखील संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या १४ जणांना वाई पोलिसांनी भीम नगर तिकटण्याच्या तपासणी नाक्यावर दुपारी ताब्यात घेतले. हे सर्व जण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशाच्या वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले. हे सर्वजण वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यातील काही लोकांचा पुण्यातील गजा मारणे टोळीशी देखील संबंध असल्याचे समजल्याने त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हि कारवाई केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bharat Biotech | कोविशिल्डनंतर कोवॅक्सिननेही कमी केले दर

DC vs KKR : दिल्ली कॅपिटल्सचा कोलकातावर ७ गडी राखून विजय