in

आंध्रप्रदेशमध्ये ऑक्सिजन अभावी १४ रूग्णांचा मृत्यू; जिल्हा प्रशासनाने आरोप फेटाळले

देशात एक्कीकडे निकालाचा जल्लोष सुरु असताना दुसरीकडे आंध्रप्रदेशच्या शासकीय कोविड रूग्णालयात १४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना, जिल्हा प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथील एका सरकारी कोविड रूग्णालयात शनिवारी १४ रूग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ऑक्सिजन अभावी रूग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, हा आरोप फेटाळत रूग्णांचे मृत्यू ऑक्सिजन तुटवड्यामुळे झाले नसल्याचं जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.ही घटना समोर आल्यानंतर सह जिल्हाधिकाऱ्यांनी रूग्णालयास भेट देऊन, ऑक्सिजन पुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी त्यांनी सांगितले कि, आमच्या पथकाने ऑक्सिजन प्लॅन्टची पाहणी केली आहे. आम्ही वॉर्डात जाऊन प्रत्येक लाईन आणि वॉल्वची तपासणी केली. तिथं कुठल्याही प्रकराची गळती नाही. ऑक्सिजन प्लॅन्टचा दाब देखील योग्य प्रमाणात आहे. पुरवठ्यामध्ये कोणतीही अडचण नाही. ऑक्सिजनचा योग्यप्रकारे वापर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात काय, रोहित पवारांचा केंद्रावर निशाणा

ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या – छगन भुजबळ