in

गुजरातेत अग्नितांडव : कोव्हिड सेंटरमध्ये आग लागून १८ रुग्णांचा मृत्यू

रुग्णालयातील आगींचं सत्र सुरूच आहे. गुजरातच्या भरूच परिसरातल्या पटेल वेलफेअर रुग्णालयाला शुक्रवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. पटेल वेलफेअर रुग्णालयातच करोना रुग्णांसाठी कोविड सेंटर देखील बनवण्यात आलं होतं.

आग लागण्याची घटना घडली, तेव्हा रुग्णालयात कोरोना रुग्णदेखील होते. मात्र, आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू करण्यात आलं.

दरम्यान, या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. आग लागण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते हुतात्मा चौकात अभिवादन

‘दिल्लीचे पातशहा महाराष्ट्राची कोंडी करताहेत’