in

डोक्याला विंचू चावल्यानं 14 वर्षीय मुलीचा मृत्यू

डोक्याला विंचू चावल्यानं एका चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या तीर्थपुरीत घडली आहे. वैष्णवी जनार्धन बारवकर असं मृत मुलीचं नाव असून ती नवव्या वर्गात शिकत होती. वैष्णवी तिच्या आईसोबत नेहमी प्रमाणे शेतात कामासाठी गेल्या होती. काल सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस आल्यानं काम आटोपून त्या घराकडे जाण्यासाठी निघाल्या.

त्यावेळी वैष्णवीनं झाडाखाली ठेवलेली ओढणी डोक्यावर घेतली असता ओढणीत असलेल्या विंचवाने वैष्णवीच्या डोक्याला दंश केला. त्यानंतर तिला असह्य वेदना होऊ लागल्यानं तिला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दहा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; अल्पवयीन आरोपींनी व्हिडीओ केला व्हायरल

अमरावतीत पीक विम्यात फसवणूक केल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन