in

SRH vs RCB Live Score | हैदराबादला विजयासाठी 150 धावांचे आव्हान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 विकेट्स गमावून 149 धावांपर्यत मजल मारली आहे. बंगळुरुकडून मॅक्सवेलने सर्वाधिक 59 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावांची खेळी केली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 150 धावांचे आव्हान असणार आहे.

सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आरसीबी प्रथम फलंदाजीस उतरली होती. बंगळुरूकडून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, तिसऱ्याच षटकात भुवनेश्वरने पडीक्कलला तंबूचा मार्ग दाखवला. त्याने 11 धावा केल्या. काही धावांच्या अंतरानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला शाहबाझ अहमदही (14) बाद झाला. त्याला नदीमने राशिद खानकरवी झेलबाद केले.कर्णधार विराट कोहलीने 33 धावा केल्या. एबी डीव्हीलियर्स आणि ख्रिस्टीयन 1 धावावर आऊट झाला. जेमिसन 12 आणि सुंदर 8 वर आऊट झाला. या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 विकेट्स गमावून 149 धावांपर्यत मजल मारली.

दरम्यान आता हैदराबादसमोर विजयासाठी 150 धावांचे आव्हान असणार आहे. हे आव्हान कसे पूर्ण करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Lockdown : “पोलिसांना लाठ्यांचा वापर करायला लावू नका”, पोलीस महासंचालकांचा इशारा

Dr.Babasaheb Ambedkar | नखापेक्षा लहान पोर्ट्रेट; महामानवाला अनोखे अभिवादन