in

पंतप्रधान मोदी खूप दिलदार, महाराष्ट्र-गोव्यासाठी १५०० कोटी देतील: संजय राऊत

तोत्के चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा करत नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १ हजार कोटींची मदत देऊ केली. या दौऱ्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“पंतप्रधानांनी गुजरातला तात्काळ मदत केली. त्याविषयी आम्हाला दु:ख असण्याचे कारण नाही. मात्र, कधीतरी पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल अशी आशा मी करतो”, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला. महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे १५०० आणि ५०० कोटींची मदत द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हेदेखील शुक्रवारी कोकणाचा दौरा झाल्यानंतर केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविली

आजचे ‘वर्क फ्रॉम होम’ स्वर्गीय राजीव गांधींमुळेच