in

IPL मधील ‘हे’ 2-3 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात; आजचा सामना पुढे ढकलला

देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून आता थेट आयपीएल वर कोरोनाचे संकट आले आहे. आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर संघाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात लढत होणार होती. कोलकोताचा संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ देखील आता विलगीकरणात गेला असल्यानं आजचा सामान होऊ शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, केकेआरच्या संघातील वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स Pat Cummins देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची माहिती दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Remdesivir | भारताच्या मदतीला अमेरिका आली धावून

‘केवळ प्रसिद्धीसाठी काम करणं ही कार्यपद्धत चुकीची’