in

कुजलेल्या अवस्थेत आढळले दोन मृतदेह

वाशिम : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील भुली शेत शिवारात काल सायंकाळच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत २ मृतदेह आढळल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, काल भुली या ठिकाणी शेतकऱ्यांना नाल्याच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पडून असल्याचे दिसून आले आहे.

त्यानंतर त्यांनी याची माहिती मानोरा पोलिसांना दिली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे. मागील दहा दिवसांत मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही मृतदेहाची ओळख पटली असून,अशोक राठोड (वय- 57) तर काशीराम आडे (वय- 60) दोघेही वाईगौळ ता मानोरा येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मात्र, मृत्यू नेमके कसे झाले आहे. याचा तपास मानोरा पोलीस करत आहेत. मृतक दोन्ही व्यक्तींचे शवविच्छेदन करणे खूप गरजेचे होते. त्याकरिता मानोरा या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्यात आला. मात्र, वृत्त लिहिस्तोवर ३ तास आरोग्य विभागाकडून कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”केंद्रानं केंद्राचं काम करावं,राज्यांच्या अधिकारांवर गदा आणू नये”

नादच खुळा… कोल्हापूरात चक्क JCB चा वाढदिवस साजरा