in

दोन वेगळ्या घटनांमध्ये मुंबईत 2 वाहनाना आग

सुदैवाने दोन्ही प्रकरणांत कोणतीही जीवितहानी नाही

भारत गोरोगावकर, रायगड
मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वर खालापूर टोल नाक्याजवळ 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 वाहनांना आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतला . कारमधील सर्व प्रवासी वेळीच कारमधून बाहेर पडल्याने बचावले . मात्र कार जळून खाक झाली.


पहाटे साडेचारच्या सुमारास मुंबईच्या दिशेने सिमेंट वाहून नेणाऱ्या एका बल्करला आग लागली. आयआरबी पेट्रोलिंग , देवदूत, बोरघाट पोलीस आणि डेल्टा फोर्स चे जवान तातडीने दाखल झाले आणि पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. मागील टायरला लायनर जाम झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Cruise Drugs Case | आर्यन खान तुरुंगात जाणार की मन्नत? आरोपींच्या याचिकेवर आज सुनावणी

विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला