in

पैठण येथील नाथसागर धरणात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

25-year-old dies after drowning in Nathsagar dam

पैठण येथील नाथसागर धरणामध्ये पाहण्यासाठी गेलेल्या पंचवीस वर्षे युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली.आदेश रमेश शिरसाट असे पाण्यात बुडुन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पैठण तालुक्यातील ईसरवाडी येथे आपल्या नातेवाईकाकडे लग्नाचा कार्यक्रम असल्याने सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर आज आपल्या नातेवाईकांसह पैठण शहरातील नाथसागर धरण पाहण्यासाठी आलेल्या आदेश रमेश शिरसाट वय २५ हा युवक धरणात पोहण्यासाठी धरणात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक किशोर पवार व पोलीस उपनिरीक्षक छोटूसिंग गिरासे यांनी घटनास्थळी जाऊन बुडालेल्या युवकाचे मृत्यूदेह पाण्याबाहेर काढण्याचे शर्ती प्रयत्न सुरू होते.दरम्यान अंधार पडल्याने मंगळवारी मृतदेह शोध कार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price Today | जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

मंत्रालयात पुन्हा बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा फोन