in

अखेर मागणी मान्य; पंढरपुरात अखेर 300 वारकऱ्यांना परवानगी

आषाढी वारीसंदर्भात मानाच्या दहा पालख्यांचे प्रमुख आणि पोलीस यांच्यात आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक पालखीसोबत यावर्षी 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या बैठकीत आळंदी पालखीचे प्रमुख विकास ढगे यांच्यासह इतर पालखी प्रमुखांनी प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना परवानगी देण्याची विनंती केली. पण कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रत्येकी 30 वारकऱ्यांसाठी परवानगी दिली.त्यामुळे दहा मानाच्या पालख्यांसोबत प्रत्येकी 30 असे एकूण 300 वारकऱ्यांना आता वारीत सहभागी होता येणार आहे. या निर्णयामुळे आता पालख्या विसाव्यापासून मठापर्यंत चालत जातील.

या आहेत मानाच्या 10 पालख्या

  • 1) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
  • 2) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
  • 3) संत सोपान काका महाराज ( सासवड )
  • 4) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
  • 5) संत तुकाराम महाराज ( देहू )
  • 6) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
  • 7) संत एकनाथ महाराज ( पैठण )
  • 8) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
  • 9) संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘हे’ राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य नाही का?, उच्च न्यायालयाचे राज्यपालांना सवाल

राज कुंद्राला अटक, पॉर्न फिल्म प्रकरण भोवलं?