in

साताऱ्यात खूनाच्या प्रकरणातील आरोपीला 3 तासांत केले गजाआड

प्रशांत जगताप, सातारा | साताऱ्यात दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात मोठ्या शिताफीने एका संशयित आरोपीस अवघ्या तीन तासांत पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक देवाण-घेवाण आणि जमिनीच्या कारणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सातारा शहरातील दिव्यानगरी येथे संतोष सुळ या 45 वर्षीय इसमाचा अज्ञातांनी दांडक्याने आणि दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज सकाळी साडेदहा घडली होती. दिव्य नगरीला जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्यात अडवून हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्रे फिरवत अवघ्या तीन तासांत एक संशयित आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच आर्थिक देवाण-घेवाण आणि जमिनीच्या कारणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे.

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विद्यार्थिनीची छेडछाड; मुंबईच्या एनसीबी अधिकार्‍याला परळी रेल्वे पोलीसांकडून अटक

कोल्हापुरात ‘स्वाभिमानी’कडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन