in

ठाण्यात घरांवर दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

राज्यात पावसाने जोर धरला आहे. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल चेंबूरमध्ये दरड कोसळल्याची घटना ताजी असतानाच आज ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व येथील घोळाई नगरमधील डोंगर परिसरात चार घरांवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापक विभागाने दिली आहे. या दुर्घटनेत चार घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात दुर्गा चाळ येथील घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेजाऱ्यांनी तात्काळ चार नागरिकांना बाहेर काढले, तर अद्यापही काही नागरिक अडकल्याची शक्यता असल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.

दुर्गा चाळ, घोलाई नगर, चर्च रोड, कळवा पूर्व येथे घरांवर दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली एकूण ७ जण अडकले होते. तर पाच जणांना बाहेक काढण्यात आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती कळवा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नंग्या तलवारी घेऊन बिल्डर आले आमने सामने

वसईत जलभरावाला महापालिका जबाबदार; 70 वर्षीय आजोबाचा साचलेल्या पाण्यात ठिय्या