in ,

5 State Assembly Election Results 2021 LIVE | बंगालमध्ये तृणमूल-भाजपमध्ये काँटे की टक्कर

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप, यापैकी कोण बाजी मारणार, याचा फैसला होईल. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या.

पाचही राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी होत आहे. सुरुवातीचे काही कल हाती यायले लागले आहेत. पाचही राज्यांच्या निवडणुकांमध्ये कोण गुलाल उधळणार याकडे संपूर्ण देशासह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

Tamilnadu Election Result Live Update : तामिळनाडूमध्ये द्रमुक 75 जागांवर आघाडीवर
तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्ष 75 तर अण्णा द्रमुक 54 जागेवर आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या 234 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडलीय

Kerala Election Result Update : निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार केरळ डावे पक्ष 1 तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर
केरळ विधानसभा निवडणुकीच्या 140 जागांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार डावे एका आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

Assam election 2021: मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल पिछाडीवर
आसाममध्ये मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल सध्या टपाल मतपत्रिकेत पिछाडीवर आहेत. ते माजोली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्याशिवाय एनडीए सध्या 17, यूपीएच्या 12 जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत. यापैकी आठ अनुसूचित जाती आणि 16 अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.

Puducherry Election Result Live: पुदुचेरीमध्ये काँग्रेस आणि भाजप आघाडीमध्ये काटें की टक्कर
पुदुचेरीमध्ये भाजप 4 जागेवर तर काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपुरात भाजपाची पुन्हा जोरदार मुसंडी

नवी मुंबईतील तुर्भेत कलर कंपनीला भीषण आग