in

सेंट्रल बँकेतील अधिकऱ्यांना पत्र देत 55 लाखांची मागणी… वर्ध्यात ‘सुसाईड बॉम्ब’

वर्धा \ भूपेश बारंगे – सेवाग्राममध्ये एका चोरट्याने नामी शक्कल लढवून सेन्ट्रल बँक लुटण्याचा प्रयत्न केला. नामी शक्कल लढवून या महाभागाने सुसाईड बॉम्ब अॅक्टिविहेट करण्याची धमकीही दिली. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे हा बनाव असल्याचे उघडकीस आले.

नक्की काय घडलं?

सेवाग्रामच्या सेन्ट्रल बँकेत एका व्यक्तीने प्रवेश केला. यानंतर त्याने एक पत्र शिपायाला दिले आणि मजकूर वाचून संपूर्ण बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मनात धडकीच भरली. आपण गंभीर आजाराने ग्रस्त आहोत. मला ५५ लाखांची गरज आहे व पैसे न दिल्यास मी ‘सुसाईड बॉम्ब अॅक्टिव्हेट’ करेल, अशी धमकी दिली. तसेच बँकेत प्रवेश करताना सोबत बनावट बॉम्ब, पिस्तुल आणि चाकू बाळगला. पण पोलिसांनी कार्य तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतलं.

सेन्ट्रल बँक ही सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर आहे. योगेश कुबडे असे या आरोपीचे नाव आहे. नेट कॅफे या व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे व कर्जबाजारीपणाला कंटाळल्याने हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

घडलेल्या घटनेची पोलीस कसून चौकशी करत असून सध्या आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“…अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊन देणार नाही”

‘या’ दिग्दर्शकासोबत अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाहबंधनात