in

Maharashtra Corona; महाराष्ट्रात ६ हजार नवे बाधित; रिकव्हरी रेट ९६.६६ टक्के

राज्यात सोमवारी २६ जिल्ह्यात अनलॉक केल्यानंतर आज आढळलेली कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामधून बरे झालेल्यांच्या संख्येत फार कमी फरक दिसून आला आहे. तर, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे.

राज्यात आज रोजी एकूण ७४ हजार ३१८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दिवसभरात ६ हजार ७९९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.आजपर्यत एकूण ६१ लाख १० हजार १२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.६६ टक्के एवढे झाले आहे.

आज ६ हजार ५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३ लाख २१ हजार ६८ झाली आहे.याशिवाय, १७७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली. आजपर्यंत १ लाख ३३ हजार २१५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीचोरी; नेवाळीतील ग्रामस्थाने समोर आणला प्रकार

अंबरनाथमधील अनधिकृत गाळ्यांवर पालिकेने फिरवला बुलडोझर