in ,

Maharashtra Corona : राज्यात आज 61 हजार 952 नवे रुग्ण; 349 रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचे निर्बंध लावून सुद्धा रुग्णांचा आकडा कमी होण्याचा नाव घेत नाही आहे. आज राज्यात 61 हजार 952 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात राज्यात तब्बल 61 हजार 952 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा 36 लाख 39 हजार 855 इतका झाला आहे. यापैकी आजघडीला राज्यात 6 लाख 20 हजार 060 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिवसभरात 53 हजार 335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 81.3% टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. दिवसभरात एकूण 349 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 59 हजार 153 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यातील कारंजात कोविड सेंटर सुरू करण्याची आमदार केचेची मागणी

NEET PG 2021 | 18 तारखेला होणारी NEET ची परीक्षा ढकलली पुढे