in

साडेतीनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विठ्ठल मंदिरात 63 हजार तुळशीची आरास..!

बीडच्या पेठ बीड भागात साडेतीनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विठ्ठल मंदिरात 63 हजार तुळशीची आरास भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. ही आरास करण्यासाठी खास पुण्याहून 63 हजार तुळशीचे रोपे मागवण्यात आली आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा गोविंद पंथ यांच्या कालावधीत या मंदीराची स्थापना झाली असून, पुजारी कुटुंबाची मागील चार पिढ्यांपासून याठिकाणी सेवा सुरू आहे. विठ्ठल मंदिरात ही आरास साकारण्यासाठी 12 तासांचा कालावधी लागला आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्ष वारी चुकल्यानं किमान पुढच्या वर्षी तरी कोरोनाचं संकट टळून आपल्या विठूरायाचं मुख दर्शन व्हावं, अशी प्रार्थना भाविक करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Raj Thackeray | चांगलं काम करा, तुमच्या घरी जेवायला येतो

Raj Kundra | राज कुंद्राच्या वेब सीरीजसाठी नग्न ऑडिशनची मागणी