in

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला;7 जणांचा मृत्यू

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. तर या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आतापर्यत पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे.

कॅम्प 2 मधील साई शक्ती बिल्डिंगमध्ये एकूण 29 फ्लॅट्स आहेत. या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट तळ मजल्यावर पडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या इमारतीत दुर्घटनेचं वृत्त समजताच उल्हासनगर अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं आहे. या दुर्घटनेत कृष्णा बजाज 24 ,दिनेश चांदवानी ,मोहिनी चांदवानी ,दीपक चांदवानी ,पुनीत चांदवानी ,नम्रता बजाज यासह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलं असलं तरी आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. दरम्यान बचावकार्य अद्याप सुरु आहे.

याआधीही दुर्घटना घडली

उल्हासनगरमध्ये यापूर्वी 15 मे रोजी निवासी इमारतीचा भाग कोसळला होता. ज्यात 4 जण ठार झाले होते. या अपघातात 11 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या इमारतीत 9 फ्लॅट आणि 8 दुकाने होती. या दुःखद घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. या अपघातानंतर महासंचालक डॉ. राजा दयानिधी यांनी सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला, 5 जणांना काढलं बाहेर

‘हाच प्रकार पटेल यांनी नगर-हवेलीत केला, तेव्हा खासदार डेलकर यांनी आत्महत्या केली’