कोरोना व्हायरसमुळे प्रत्येकाचेच जगणे असह्य केले आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक मृत होत चालली आहेत.त्यात आता एकाच चितेवर आठ जणांना अग्नी दिला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने मन हेलावून टाकले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. अंबाजोगाईमध्ये सुद्धा रुग्णसंख्या दररोज शंभरच्या पुढे जात आहे. आज अंबाजोगाईमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. या आठ ही रुग्णांना एकाच चितेवर अग्नि देण्यात आला. या दृष्यांनी मन हेलावून टाकले आहे.
रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य सुविधा अपुरी पडत चालली आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग वाढू नये यामुळे अंतिम यात्रेला सुद्धा कुटुंबाला मुकावे लागत आहे. मात्र आता तर शमशानही अपुरे पडू लागले आहेत. कारण आज भटगल्ली, मंगरूळ, धारूर, आपेगाव, बोरखेड यासह आठ ठिकाणच्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या सर्व मृतदेहावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दृश्य मनाला चटका लावणारे होते. त्यामुळे लोकांनी काळजी न केल्यास परिस्थिती अवघड होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Comments
Loading…