in

Maharashtra Corona | महाराष्ट्रात ८ हजार ९५० रूग्ण कोरोनामुक्त

राज्यात आज कोरोनातून बरे झालेल्या नागरिकां एवढाच नवीन बाधितांचा आकडा समोर आला आहे. तसेच राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण काहीस कमी होताना दिसत आहे.

राज्यात आज रोजी एकूण १ लाख ४२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ८ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच १२४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

तर दिवसभरात ८ हजार ९५० रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ७४ हजार ५९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.२८ टक्के एवढे झाले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात प्रियकरासह मित्राला मारहाण… दोघांचा मृत्यू!

“शरद पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर”