in

भिवंडीतून हुक्का फ्लेवरचा 9 कोटीचा साठा जप्त

भिवंडीत गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल 9 कोटी 36 लाख 78 हजार 520 रुपयांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित निकोटीनयुक्त ‘अफजल’ व ‘सोएक्स हर्बल’ या हुक्का फ्लेवरचा साठा जप्त केला आहे.

गुन्हे शाखा भिवंडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिलेल्या माहिती नुसार 6 ऑक्टोबर रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार धामणकर नाका येथील “अल्ताफ अत्तरवाला’ या दुकानावर छापा टाकून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या हुक्क्याचे वेगवेगळ्या प्रकारचे 57 हुक्का फ्लेवरचा 8940 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास करताना वरिष्ठांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे निर्दश दिल्याने भिवंडी शहर परिसरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेल्या हुक्क्याच्या साठ्याचा शोध घेताना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहिती नुसार दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील हरीहर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील , हायस्ट्रीट इम्पेक्स लि. मुंबई या कंपनीच्या तीन गोदामांवर वपोनि अशोक होनमाने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने छापा टाकला असता गोदामात निकोटीनयुक्त ‘अफजल हुक्का फ्लेवर’ चे 2862 बॉक्स – किंमत 8 कोटी 42 लाख 49 हजार 610 रुपये व ‘सोएक्स हर्बल फ्लेवर’ चे 375 बॉक्स – किंमत 94 लाख 28 हजार 910 रुपये असा एकूण 9 कोटी 36 लाख 78 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात भिवंडी गुन्हे शाखेस यश मिळाले आहे.

सदर सोएक्स इंडीया प्रा. लि. या कंपनीकडुन बनविलेला निकोटीनयुक्त ‘अफजल हुक्का फ्लेवर’ हा माल भिवंडी शहर परिसरा सह ठाणे मुंबई यासह महाराष्ट्र राज्यामध्ये इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी स्पष्ट केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sameer Wankhade | एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत?

SAFF Championship: सुनील छेत्रीने केली महान फुटबॉलपटून पेलेची बरोबरी