in

राज्यात म्युकरमायकोसिसचे ९० बळी

म्युकरमायकोसिस हा रोग झपाट्याने पसरत आहे. या रोगाने आतापर्यंत ९० रुग्णांचा बळी गेला असून ५०० रुग्णांनी आजारावर मात केली आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये ८५० रुग्णांवर उपचार सुरू असून तो खर्चिक असल्याने रुग्णांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.

म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी अत्यावश्यक इंजेक्शनची सध्या टंचाई असल्याने केंद्र सरकारने त्वरित वाढीव साठा उपलब्ध करून देण्याची मागणीही टोपे यांनी केली.

सरकारने टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध लागू केल्याने राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाट्याने खाली येत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क््यांच्या पुढे गेले असून सक्रिय रुग्णांची संख्याही सात लाखांवरून चार लाखांपर्यंत खाली आली आहे. करोना रुग्णांवरील उपचाराबाबत सरकारकडे प्राणवायू, रेमडेसिविरसह अन्य पुरेशा सुविधा उपलब्ध असून करोना नियंत्रणात येत आहे ही दिलासादायक बाब असली तरी म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आजार चिंता वाढविणारा असल्याचे टोपे यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता घरातच करु शकता कोरोना चाचणी!

महाराष्ट्राला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा किती धोका?