in

नाशिकसारखी मोठी दुर्घटना टळली; वेळीच ऑक्सिजन मिळाल्याने १०० रुग्णांचा जीव वाचला

शहरातील राजकीय दून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री एकाच वेळी अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली. त्यामुळे ऑक्सिजन लाईनमध्ये प्रेशर वाढल्यानं रुग्णांना पुरवठा करण्यास समस्या जाणवली. अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले होते. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्यांसोबत संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणली.

मंगळवारी रात्री जवळपास १०० पेक्षा अधिक रुग्णांना एकाच वेळी ऑक्सिजनची गरज भासली. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटपासून लाईन सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ आणि अन्य कर्मचाऱ्यांनी वेळीच नियोजन केले. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने अनेक रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला आणि यात २२ रुग्णांचा मृत्यू झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मयुर शेळकेचे पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन

एसटीबाबत काय नियम असणार?; अनिल परब म्हणाले…