in ,

पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानसमोर महिला होमगार्डने स्वतःला पेटविले

भूपेश बारंगे | वर्ध्यातील पिपरी मेघे येथील पोलीस वसाहतीत स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या घराच्या दारासमोर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.मात्र तिने हे टोकाचं पाऊल का उचललं, याच नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही.घटनास्थळी उलटसुलट चर्चेला मात्र उधाण आले होते,त्यातूनच हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पिपरी मेघे येथील पोलीस वसाहतीत रात्रीच्या सुमारास एका महिला होमगार्डने अंगावर पेट्रोल घेत स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत महिला गंभीररित्या भिजल्याने तिला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरासमोर महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
वर्ध्याच्या आदिवासी कॉलनी परिसरात पिपरी मेघे येथील पोलीस वसाहतीत महिलेने स्वतःला पेटवून घेतले. महिलेने स्वतःला पेटवल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना लक्षात येताच पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात घटनेत महिला 70 ते 80 टक्के भाजली असल्याची माहिती असून तिला नागपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची वरिष्ठ पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात आज 44,388 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्करला आजपासून बूस्टर डोस