in

‘ते’ ट्विट का डिलीट केलं?, आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

राज्यात मोफत लसीकरण होणार असल्याचं ट्विट करून ते ट्विट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच डिलीट केले होते. या डिलीट ट्विट वरून विरोधकांनी आदित्य ठाकरे यांना चांगलेच घेरले होते. त्यानंतर आज राज्यात मोफत लसीकरणाची घोषणा झाल्यानंतर त्या डिलीट ट्विट बाबत स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यात १८ ते ४४ या वयोगटासाठी देखील मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.याआधीच ४५ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण केलं जात होतं. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.

या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी नवं ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी डिलीट करण्यात आलेल्या ट्विटवरही भाष्य केलं आहे. तीन दिवसांपूर्वी मी माझं ट्विट डिलीट केलं होतं. कोणताही संभ्रम किंवा गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून मी ट्विट डिलीट केलं होतं. आता मंत्रिमंडळाने मोफत लसीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही बातमी शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनोरुग्णाने खाल्ला अर्धवट जळालेला मृतदेह; फलटण स्मशानभूमीतील प्रकार

CSK vs SRH:हैदराबादला पहिला धक्का; जॉनी बेअरस्टो ७ धावा करून बाद