in

आमीर खान कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच आता बॉलिवूड अभिनेता आमीर खानला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आमिर खान क्वारंटाइन झाला आहे. दोन दिवसांपूर्वी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झाला होता आमीर खानने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं घरातही कोरोनाचा शिरकाव झाला असून, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेही सध्या उपचार घेत आहेत.

“आमीर खानला करोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचं पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी,” अशी माहिती अमीर खानच्या निकटवर्तीयांनी सांगितली आहे.

जागतिक जल दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमीर खानची पत्नी किरण राव आदी उपस्थित होते. त्यामुळे आता आमीरच्या संपर्कात आलेल्या सर्वांबरोबरच कदाचित मुख्यमंत्र्यांनाही कोरोना चाचणी करावी लागू शकते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंग यांच्या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

“सरकारमध्ये असतो तर, परमबीर सिंह यांना निलंबित केलं असतं…”