in

अमिर खानच्या मुलीला ‘या’ कारणासाठी हवे आहेत इंटर्न्स

बॉलिवूड अभिनेता अमिर खान यांची कन्या इरा खान हीने लोकांमध्ये मेंटल हेल्थबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. डिप्रेशन किंवा अनेक मेंटल प्रॉब्लेम्स असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी इराने मोठी भुमिका घेतली आहे. एवढचं नाही तर तिने सुरु केलेल्या कामासाठी तिला इंर्टन्सची देखील गरज आहे. या कामामध्ये मेंटली डिस्टर्ब असलेल्या लोकांना फोन करुन त्यांच्याशी संवाद करायचा आहे.

इरा खानने सुरु केलेल्या कामासाठी लागणारे 25 इंटर्न्स यांना एक महिना काम करायला लागणार आहे. एवढचं नाही तर हे इंटर्न्स देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातले असायला हवे. प्रत्येक राज्यातील एका व्यक्तीला ही इंटर्नशिप मिळणार असून त्यांना पाच हजार रुपये पगार देखील देण्यात येणार आहे. या कामासाठी लागणाऱ्या इंटर्न्सना वेगवेगळ्या भाषा बोलता यायला हव्यात. अशी अट इराने घातली आहे.

इरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने मेंटल हेल्थबाबत अनेक व्हिडिओ शेअर केेले आहेत. एवढचं नाही तर तिच्या कामाची जाहिरात आणि माहिती सुद्धा तिने तिच्या इन्स्टाग्रामवरुनच दिली होती. एका व्हिडिओमध्ये बोलताना इरा स्वतः चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होती, असं तिने सांगितलं आहे.

दरम्यान, इंटर्नशिप व्यतिरिक्त जर कोणाला मोफत व्हालेंटियरिंग करायचं असेल तर असे लोक देखील या कामासाठी अप्लाय करु शकतात, असं इराने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. या कामासाठी इरा सोबत संपर्क साधू इच्छीणाऱ्यांसाठी इराने पोस्टमध्ये तिचा ई-मेल आयडी दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रश्मी शुक्लांनीही देशमुखांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला; परमबीर सिंहाचा याचिकेत दावा

राजेश टोपे LIVE | २ दिवसात लॉकडाऊनचा निर्णय घेणार