in

‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी तब्बल एकाच दिवशी ७ सभा घेतल्या. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. गायक आनंद शिंदे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आनंद शिंदे यांनी गाण्याच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’, असा टोला आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लगावला.

काय म्हणाले होते फडणवीस?

एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव व मंगळवेढा इथं भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले असता त्यांनी हे विधान केलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Corona : नालासोपाऱ्यात ऑक्सिजन अभावी १० रुग्णांचा मृत्यू… नातेवाईकांचा आक्रोश

Gudi Padwa | असा साजरा करा गुढीपाडवा