in

Ashadhi Wari | ”मी नसलो तर मुख्यमंत्र्यांची पूजा यशस्वी होणार नाही”

प्रशांत जगताप | बिगबॉस फेम अभिजित बिचुकले आषाढी एकादशीसाठी पंढरपुरला रवाना झाला आहे. भगवंताच्या मनात असले तर मी पोहचणार असून पूजेला मी नसलो तर पूजा यशस्वी होणार नाही असं ठाम मत बिचुकले यांनी व्यक्त केलं आहे.

आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार असल्याचे सांगितले होते त्याप्रमाणे मी निघालो आहे. संपूर्ण नाकेबंदी केली असून भगवंताच्या मनात असले तर मी पोहचेन असे बिचुकले म्हणाले आहेत.

दारूची दुकाने उघडी असून राजकीय मेळाव्यांना हजारो लोक गर्दी करतात मग सज्जन वारकऱ्यांना का रोखलं? असा सवाल उपस्थित करत हे राज्य इंग्रजांपेक्षा वाईट असल्याची टीका अभिजित बिचुकले यांनी केली. तसेच पूजेला मी नसलो तर पूजा यशस्वी होणार नाही असं ठाम मत अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘देवमाणुस’ मालिका वादाच्या भोवऱ्यात

अखेर प्रतिक्षा संपली… रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत दाखल