in

Abhishek Bachchan Birthday ;अभिषेक बच्चन यांचा आज वाढदिवस

लोकशाही न्यूज नेटवर्क | भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अभिषेक बच्चन यांचा आज वाढदिवस. अभिषेक बच्चन हे बिग बी अमिताभ बच्चन यांचे सुपुत्र आहेत.

बच्चन यांच्याविषयी :

  • अभिषेक यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत झाला, त्यांचे शिक्षण मुंबईतील जमानाबाई नरसी स्कूल आणि बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले.
  • अभिषेक यांनी 2000 सालच्या ‘रेफ्युजी’ या चित्रपटामधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरूवात केली.
  • त्यानंतर 2005 साली त्यांचे चित्रपट बंटी और बबली, सरकार’, दस आणि ब्लाफ़मास्टर चित्रपटांनी उंच भरारी घेतली.
  • अभिषेक यांनी ‘रेफ्युजी’ या चित्रपटानंतर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
  • त्यांना आजपर्यंत 3 फिल्मफेअर पुरस्कार, 1 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
  • दि.20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चन यांचा मिस वर्ल्ड लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्याशी विवाह झाला.
  • त्यांना अभिनयासोबतच खेळाचीदेखील आवड आहे, ते जयपूर पिंक पँथर्स कबड्डी संघ आणि चेन्नई फुटबॉल क्लबचे मालक आहेत.
  • आर. बाल्की यांचे राष्ट्रीय-पुरस्कार प्राप्त कॉमेडी-नाटक ‘पा’ या चित्रपटातून अभिषेक बच्चन निर्माते बनले.
  • तदनंतर त्यांनी ‘सरस्वती एंटरटेनमेंट’ प्रोडक्शन कंपनीच्या माध्यमातून अनेक चित्रपटांची निर्मिती केली.
  • दरम्यान, अभिषेक बच्चन हे उत्तम पात्र आणि बळकट भूमिका निभावणारे चित्रपट सृष्टीतील विश्वासार्ह कलाकारांपैकी एक आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ईएसआय रुग्णालयांसाठी एमआयडीसी देणार 10 भूखंड

राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे 70 हजार कोंबड्या नष्ट