in

वर्ध्यात जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रेमडीसीविर उपलब्ध – जिल्हाधिकारी

वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून रेमडीसीविर इंजेक्शनची गरज असणाऱ्या रुग्णांना आरोग्य विभागाच्यावतीने इंजेक्शन पुरविण्यात आले आहे. जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात रेमडीसीविर इंजेक्शन व आवश्यक औषधी उपलब्ध असून जिल्ह्यात तुटवडा असल्याच्या अफवेवर विश्वास ठेवू नका असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांना लागणारी रेमडिसिव्हर इंजेक्शन ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.जिल्ह्यात सामान्य रुग्णालयात २७५१ इंजेक्शन प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी १२०० इंजेक्शन सध्या उपलब्ध आहे.सामान्य रुग्णालयातून जिल्ह्याचे दोन्ही कोव्हिडं रुग्णालयाला इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. सध्या साठा मुबलक असून आणखी इंजेक्शन लवकरच येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलीय.सोबतच जिल्ह्यात खाजगी औषधी दुकानात ही इंजेक्शन विकल्या जात नसून फक्त जिल्हा प्रशासन ही इंजेक्शन विकत घेत कोव्हिडं रुग्णालयांना देत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

LIC च्या कर्मचाऱ्यांचा होणार पगारवाढ

corona Maharashtra| … आणि महिलेला रुग्णालयाबाहेर रिक्षातच ऑक्‍सिजन लावायची वेळ