in

साताराच्या हिरकणी रायडरचा नांदेडमध्ये अपघाती मृत्यू

प्रशांत जगताप, सातारा | साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी सातारच्या 9 महिला हिरकणी बाईक रायडर्स ग्रुपच्या माध्यमातून दुचाकीवरून निघालेल्या शुभांगी संभाजी पवार या 32 वर्षीय महिला रायडरचा अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे अपघात झाला. या अपघातात टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने शुभांगी यांचा अपघात ठिकाणीच मृत्यू झाला.दरम्यान या घटनेने साताऱ्यात हळहळ व्यक्त आहे.

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या 10 ऑक्टोबर रोजी 1 हजार 868 किमी प्रवासासाठी मोटार सायकलने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाल्या. कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन ते तुळजापूर येथे पोहचल्या. आई तुळजाभवानीचे दर्शन करून पुढील माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी जात असताना भोकर फाटा दाभड येथे टँकर सोबत शुभांगी पवार यांच्या दुचाकीचा अपघात झाला. टँकरची जोरदार धडक बसल्याने शुभांगी पवार जागीच ठार झाल्या. अपघातानंतर शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर जि. नांदेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने साताऱ्यात हळहळ व्यक्त आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शाहरुखच्या समर्थनात अभिनेत्री स्वरा भास्करने ‘ही’ कविता शेअर करत दर्शवला पाठिंबा !

देवगड-गिर्ये येथे खडकाला आदळून बोट दुर्घटनाग्रस्त