in

वर्ध्यात परवाना संपलेल्या मेडिकलवर कारवाई

वर्धा जिल्ह्यात वर्ध्यातील आंजी येथे मुदत संपलेल्या मेडिकलची विनापरवाना दुकान सुरू असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई करण्यात आली असून दोन लाख 65 हजाराचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाईत डॉक्टराच्या नावाने सुरू असलेली मेडिकलचा परवाना संपल्यानंतर त्याचा भाऊ विनापरवानगी मेडिकल चालवत असल्याचे कारवाईत समोर आले आहे.

आंजी येथील साईकृपा मेडिकल स्टोअरचा परवाना 31ऑक्टोबर 2020 ला संपला होता ,मात्र तरी सुध्दा डॉ.अमोल गोमासे यांच्या नावाने असलेलं मेडिकल त्यांचे मोठे भाऊ अतुल गोमासे हे चालवत असल्याचे अन्न व औषध प्रशासन माहिती मिळाली. याची चौकशी करण्यासाठी प्रशासन गुरुवार येथे पोहचले असता तापसणी दरम्यान दुकानाला फलक लागलेला दिसले व दुकानातून औषध विक्री सुरू असताना औषध परवाना दुकानात आढळून आले. यावेळी दुकानात फार्मसिस्ट उपस्थित नव्हता, तर दुकानात मोठया प्रमाणात औषध साठा दिसून आला. तपासणी अंती संपूर्ण औषध साठा जप्त केला असून दोन लाख 65 हजार रूपायचा माल आढळून आला.अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

३० वर्षे पोलिसात काम करून तुमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही? सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले

Maratha Reservation: “संभाजीराजे माझे बंधूच, हे त्यांचेच घर कधीही यावं”