in

दीपिका पादुकोण ठरली आशियातील सर्वात प्रभावशाली महिला, पहिल्यांदा भारतीय अभिनेत्रीला मिळाला असा सन्मान

बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण हिचे नाव कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात तिने एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या दीपिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर भरपूर यश मिळवलं आहे.

नुकतंच दीपिकाला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळाला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारी दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

दीपिकाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. यामुळे सर्वाधिक चाहतावर्ग असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत ती टॉप १०० मध्ये येते. सध्या दीपिकाचे इन्स्टाग्रमावर जवळपास ५९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर गुगलवरही ती नेहमीच ट्रेडींगवर पाहायला मिळते.दीपिकाच्या सर्वाधिक चाहत्यावर्गामुळे तिला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून निवडण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ज्योती देवरेंच्या अडचणीत वाढ; लाचलुचपत विभागात तक्रार दाखल

14 सप्टेंबरला ‘हिंदी दिवस’ का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास