in

अभिनेत्री श्रुती मराठेचा वाढदिवस…फॅन्स ने दिले सरप्राईज

पुणे | 9 ऑक्टोबरला श्रुती मराठेचा वाढदिवस झाला ही तिच्या फॅन्स सोबत नेहमीच संपर्कात असते. गेल्या वर्षी कोव्हिडमुळे कोणाला भेटता येत नव्हते परंतु यावर्षी तिच्या फॅन्सने तिला तिच्या वाढदिवसाला सरप्राईज देण्याचे ठरवले.

श्रुती गेले काही दिवस पुण्यात अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटाचे शूटिंग करत होती. याचनिमित्त साधून तिच्या फॅन्सने तिला बोलावून तिचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. कोव्हिडच्या नियमांचे पालन करून हा सोहळा पुण्यात पार पाडला. यामध्ये श्रुती मराठे फॅन्स क्लब, तसेच पसाय इन्व्हेंटो यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. यामध्ये पुणे, नांदेड, पनवेल, अशा अनेक ठिकाणांहून श्रुतीचे फॅन्स आले होते. फॅन्सनी तिच्याशी विविध विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या, श्रुतीनेही त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.आणि हा सोहळा पार पडला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे संदीप आवारी बिनविरोध

एमजी मोटरने लॉन्च केली ‘अॅस्टर’; भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट कार