in

‘या’ दिग्दर्शकासोबत अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाहबंधनात

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न केले आहे.यामीने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत ४ जूनला आपला विवाहसोहळा पार पडल्याची माहिती दिली. त्यांनतर बॉलीवूडमधुन आणि चाहत्यांकडून यामीला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

यामीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली असून तर आदित्यने सफेद रंगाची शेरवानी परिधान केली आहे.हा फोटो फोटो शेअर करत असताना यामीने ‘कुटुंबीयांच्या आशिर्वादाने आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्न सोहळा पार पाडला आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सेंट्रल बँकेतील अधिकऱ्यांना पत्र देत 55 लाखांची मागणी… वर्ध्यात ‘सुसाईड बॉम्ब’

केंद्र सरकारचा ट्विटरला इशारा, अन्यथा परिणामांना तयार राहा