in ,

Adani समुहाकडून मुंबई विमानतळ टेकओव्हर, जाणून घ्या अहमदाबाला कार्यालय हलवण्याचं कारण

श्वेता चव्हाण | काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समुहाने विकत घेतले. त्यामुळे मुंबई विमानतळाचा ताबा आता जीव्हीकेकडून अदानी कंपनीकडे गेला आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाता अधिकार संपादन करण्याची घोषणा केली होती. यात आता नवी मुंबई विमानतळाचा ताबाही अदानी समुहाकडे गेला आहे. अदानीच्या या निर्णयामुळे मुंबईतील सर्वात मोठी कंपनी मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे.

दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या टर्मिनल दोनची दुसरी वास्तू उभी राहिल्यानंतर मुंबईला दुसऱ्या विमानतळाची गरज आहे का, हा विषय पुन्हा चर्चेला आला. पण या वास्तूची प्रवासी हाताळण्याची क्षमता चार कोटी होती, जी केव्हाच पूर्ण झाली आहे. २०१५मध्येच मुंबई विमानतळाची प्रवासी वहन क्षमता ओलांडली गेली. ‘सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन’ या संस्थेच्या अहवालानुसार, २०२५पर्यंत मुंबईची विमानवाहतुकीची गरज साडेआठ कोटी प्रवाशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. २०१२मध्ये भारताकडे ४३० विमाने होती, २०२०मध्ये ती एक हजारांवर पोहोचली. साहजिकच विमानांसोबतच विमानतळासाठीच्या सोयी-सुविधांवर ताण येतो आहे.

मुंबई विमानतळाची एकूण जागा दोन हजार एकरच्या घरात असली, तरी त्यातील जवळपास ६००एकर जागेवर अतिक्रमण आहे. त्यामुळे प्रत्यक्षात विमानतळ १४००एकरवरच आहे. दिल्लीच्या ‘इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा’शी तुलना केल्यावर आपल्याला अडचणी लक्षात येतील. दिल्लीचा विमानतळ ५,१२३ एकर, तर हैदराबादचा ५,४२९ एकरवर आहे.

मुंबईचे विमानतळ जीव्हीके समूहाकडे होते. परंतु, जीव्हीके समूह आर्थिक संकटात आल्याने हे विमानतळ अदानी समूहाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. विविध पातळ्यांवरील न्यायिक प्रकरणांनंतर अखेर हे विमानतळ खरेदी करण्याला अदानी समूहाला हिरवा कंदीला मिळाला. मागीलवर्षी ही खरेदी प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानुसार अलिकडेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ‘सिडको’ महामंडळानेही या खरेदीला मान्यता दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर ‘मिआल’च्या संचालक मंडळाची बैठक आज झाली. त्यामध्ये या विमानतळाचे पूर्ण व्यवस्थापन एएएचएलकडे सोपविण्यास हिरवा कंदील मिळाला.

गुजरातमधून निर्णय गतीने घेण्यास मदत होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. १३ जुलैला अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं जीव्हीके ग्रुपकडून व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता. त्यानंतर आता मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवलं जाणार आहे. या निर्णयानंतर अदानीने जाहीर केले की, कंपनीच्या कामात सुसूत्रता आणि सुलभता यावी यासाठी मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात आल्यााची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

‘मिआल’मध्ये जीव्हीके समूहाची हिस्सेदारी ५०.५० टक्के होती. बिडवेस्ट कंपनीचा हिस्सा १३.५० टक्के व एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका यांची भागीदारी १० टक्के होती. उर्वरित २६ टक्के हिस्सा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे. विमानतळ खरेदी करण्याच्या प्रक्रियेत अदानी एंटरप्राइझेसने सुरुवातीला यापैकी २३.५० टक्के हिस्सा १६८५ कोटी रुपयांना पूर्णपणे खरेदी केला. त्यानंतर पुढील टप्प्यात जीव्हीके समुहाचा ५०.५० टक्के हिस्सा खरेदी केला. हा हिस्सा खरेदी करण्याआधी जीव्हीकेच्या डोक्यावर असलेले २५०० कोटी रुपयांचे कर्जदेखील अदानी समूहाने भागभांडवलात परावर्तित केले.

‘एएएचएल’ आता सर्वात मोठी कंपनी
‘एएएचएल’ ही अदानी एंटरप्राइझेसची उपकंपनी आहे. मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचे नियंत्रण घेतल्यानंतर आता कंपनीच्या भात्यात आठ विमानतळ आले आहेत. यामुळे ही देशातील सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी झाली आहे. देशभरातील विमानतळांवरील एकूण प्रवाशांपैकी २५ टक्के प्रवासीसंख्या आता अदानी समूहांतर्गत आली आहे. ‘मिआल’च्या व्यवस्थापनाचा ताबा आल्यापासून ३३ टक्के कार्गो वाहतूकही अदानी समूहांतर्गत आली आहे.

अदानींकडे एकूण किती विमानतळे?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ताबा घेतल्यामुळे अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड आता देशातील सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा पुरविणारी कंपनी झाली आहे. आता अदानी समूहाकडे देशातील सात विमानतळाचा ताबा मिळालेल्या आहे. ज्यामध्ये लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे. या सात ही विमानतळांच्या विकास, व्यवस्थापन आणि परिचालनाची पुढील ५० वर्षांसाठी जबाबदारी असेल. विमानतळांच्या संख्येनुसार अदानी समूह देशातील सर्वात मोठा एअरपोर्ट ऑपरेटर ठरली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Naughty Raj Kundra | राज कुंद्राच्या अटकेनंतर नेटकऱ्यांकडून मिम्सचा पाऊस

Pegasus Spyware | “पेगॅसस हे भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र”