in

मुंबई एअरपोर्टचं मुख्यालय गुजरातला हलवणार…अदानी समूहाचे स्पष्टीकरण

मुंबई विमानतळ अदानी समूहाने टेकओव्हर केल्यानंतर मुंबईतले मुख्यालय गुजरातला हलवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चेवर आता अदानी समूहाने स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई एअरपोर्टचं मुख्यालय गुजरातला हलवणार असल्याची चर्चा ही फक्त अफवा असल्याचं ‘अदानी’ समूहाने सांगितले आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जनं GVK ग्रुपकडून मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता. त्यानंतर, “अदानी ग्रुप एअरपोर्ट सेक्टरमध्ये गतीने पुढे जात आहे. अशात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आपलं मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.” असं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यासोबतच, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे आर. के. जैन याना सीईओ एअरपोर्ट अशी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आज अदानी समूहाने यासंदर्भात आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या ट्वीटमध्ये यांदर्भात खुलासा केला आहे.

“मुंबई विमानतळ मुख्यालय अहमदाबादला हलवण्यात येणार असल्याच्या अफवा सुरू झाल्या आहेत. मात्र, आम्ही ठामपणे सांगतो की मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाची मुख्यालयं मुंबईमध्येच राहणार आहेत. मुंबईकरांना गर्व वाटावा आणि आमच्या विमानतळ व्यवस्थेतून हजारोंसाठी रोजगार निर्माण व्हावा, यासाठीची आम्ही बांधील आहोत”, असं अदानीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जात पंचायतीकडून बहिष्कृत; महिलेने तक्रार केल्याने झाली मारहाण

Local Restart | “…तोपर्यंत लोकल सुरु करता येणार नाही,” – अस्लम शेख