in

1 जूनपासून सर्व निर्बंध शिथील करणार नाही

महाराष्ट्रात कोरोना संकटामुळे 1 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. परंतु आता हा लॉकडाऊन 1 जूनपासून शिथील करणार की वाढवणार या गोष्टींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र लगेचच काही उघडणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन आपल्याला हळूहळू उघडावे लागेल. कोरोना स्थिती पाहून निर्णय होईल. लसीचा जसा पुरवठा होतो तसं लसीकरण आपण करतोय. चिंतेत राहू नका , गर्दी करू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

मागच्यावेळी लॉकडाऊन हटवल्यानंतर आकडे अचानक वाढले. आता आकडे जरी कमी असले तरी लगेचच सर्व काही सुरु होणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आपण 7 दिवसात मुंबईतील संपूर्ण लसीकरण करु. भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असतं त्यांना ते करू द्या, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संभाजीराजे यांना भाजपनं किती सन्मान दिला, ते सांगत नाही : चंद्रकांत पाटील

वीजेची मागणी कमी झाल्याने परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद