in

Lokshahi Impact;लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासन जागे; ऑक्सिजन टँकर मिरजमध्ये दाखल

सांगलीत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून रुग्णांचा जीव टांगणीला असल्याची बातमी लोकशाही न्युजने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने तत्काळ पोलीस बंदोबस्तात ऑक्सिजन टँकरला मिरजेत दाखल केले. त्यामुळे रुग्णांच्या जीवात हि जीव आला आणि मोठा अनर्थ होण्यापासून टळला आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय रुग्णालयात सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुरेल इतकाचं ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर यांनी दिली होती. या माहितीनंतर लोकशाही न्यूजने सांगली जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून रुग्णांचा जीव टांगणीला आहे. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त करत बातमी दिली होती.

लोकशाही न्युजच्या बातमीची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेत स्थानिक प्रशासनाला या घटनेवर तत्काळ दखल घेण्यास सांगितले. स्थानिक प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. आणि ऑक्सिजन टँकरची अंत्यभूत माहिती घेत पोलीस बंदोबस्तात विलंब होणारा टँकर मिरजेत पोहोचवला. त्यामुळे लोकशाही न्युजने दिलेल्या या बातमीनंतर मोठा अनर्थ टळला तसेच रुग्णांसह नातेवाईकांनी सुटकेचा श्वास घेतला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, मुंबईत महापालिका करणार घरोघरी जाऊन लसीकरण

आयडियाची कल्पनाच; नाशिकमध्ये ड्रोनद्वारे केली सॅनिटायझरची फवारणी