in

अहमदाबादच्या शाळेत आग; ४ मुलं अडकली

अहमदाबादच्या कृष्णानगर परिसरातील अंकुर स्कूल या शाळेत आग लागल्याची घटना पुढे आली आहे. या आगीत 4 मुलं अडकल्याची माहिती मिळत आहे. तरिही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शाळेच्या इमारतीमधून आगीचे लोळ उठत आहेत. तसेच अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सध्या हा प्रश्न उपस्थित होत आहे की, कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. मग या शाळेत विद्यार्थी आले कुठून. या शाळेत आग कशी लागली, याबाबत सध्या काहीही माहिती नाही. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘भाजप नेते बोलतात मग एनआयएकडून माहिती येते, हा काय प्रकार?’

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट