in

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विधानभवन इथं 61 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मान्यवरांमध्ये आणि छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित असणार आहेत.

पुण्यात २० हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. सीरमच्या अदर पुनावाला यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ध्वजारोहणानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, अजित पवार 11 वाजता विधानभवनात पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी, दोन्ही महापालिकेचे आयुक्त, महापौर, पोलीस आयुक्त, तसेच लोकप्रतिनिधी आणि आरोग्य अधिकारी उपस्थित असणार आहेत.

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवल्यानंतर अजित पवार आजच्या बैठकीत काही नियम कडक करतात की शिथिल करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘सोशल मीडियावर मदत मागणारे, टीका करणाऱ्यांवर कारवाई केल्यास खबरदार’

मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते हुतात्मा चौकात अभिवादन