in

‘संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही हा विश्वास महाराजांनी दिलाय’

संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी जिद्द, बुद्धी, चातुर्य आणि संयमानं त्याला पराभूत करता येतं हे महाराजांनी वारंवार सिद्ध केलं. महाराजांचं हे कर्तुत्व व निर्माण केलेला राज्यकारभाराचा आदर्श प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणा देईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं, कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचं राज्य स्वराज्य स्थापन केलं. महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान शिकवला. संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. आज ३०० वर्षांनंतरही महाराजांचं कार्य, त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देत आहेत.

छत्रपतींनी दिलेल्या विचारांवरच राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे. राज्यावर आज कोरोनाचं मोठं संकट आहे. याचा मुकाबला करताना सरकार आणि नागरिक दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून आपापली कर्तव्ये पार पाडतील, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवार यांना मिळाला डिस्चार्ज

Pune mini lockdown : खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात