in

अजित पवार आज पूरग्रस्त कोल्हापूर दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल खराब हवामानामुळे ते कोल्हापूर ते दौऱ्यावर येऊ न शकल्याने त्यांनी आज पुन्हा आपला दौरा सुरू केला आहे.

गेल्या पाच दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या महापुरामुळे लाखो लोक पूर बाधित झाले आहेत. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ परिसरात दाखल झाले आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून अजित पवार यांनी त्यांचा दौरा सुरू केला असून शिरोळ ,इचलकरंजी ,कोल्हापूर शहर या परिसरात ते पूर स्थितीची पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांशी चर्चा करणार आहेत. यानंतर कोल्हापुरात अधिकाऱ्यांसोबत आढावा घेणार आहेत. महापुराने कोल्हापूर जिल्ह्याचे जवळपास 300 कोटी रुपयांचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार मदतीची काय घोषणा करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता

Angarki chaturthi 2021 | सिध्दीविनायक मंदिरातून ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था