in

ओमायक्रॉनचे रुग्ण वाढल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा कठोर नियम लागू होण्याची शक्यता – अजित पवारांनी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री प्रकृतीच्या कारणास्तव येऊ शकले नाहीत असं यावेळी त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने सध्या चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आठ झाली आहे. यामुळे कोरोनाचा उद्रेक पाहिलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कठोर नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं असून केंद्राने भूमिका घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचं यावर बारकाईनं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे जे रुग्ण येतात त्यासंबंधी केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेतली पाहिजे. जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत तिथे नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतं की नाही हेदेखील पाहिलं पाहिजे”.

“याआधीदेखील आपण मार्च महिन्यात अनुभव घेतला होता. एक दांपत्य दुबईवरुन आलं, त्यांच्यामुळे चालकाला कोरोना झाला आणि तेथून फोफावला. आताही देशातील इतर राज्यात एक दोन रुग्ण दिसत होते. पण त्यांच्या फक्त कुटुंब नाही तर नातेवाईकांनाही लागण झाल्याचं दिसत आहे. खूप जण काळजी घ्या, नियमांचं पालन करा, मास्क वापरा, तीव्रता कमी आहे सांगतात. पण त्याबद्दल देश पातळीवरच आरोग्य विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकदा भूमिका स्पष्ट केली पाहिजे,” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारतरत्न डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रांगा

बाबासाहेबांच्या विचारांचा जागर, काय सांगतात बाबासाहेबांचे विचार ?