in ,

‘दुसऱ्या देशांना लस दिल्यामुळेच आपल्याला कमतरता’

सुरुवातीच्या टप्प्यात तयार होणारी लस दुसऱ्या देशांना देण्याची गरज नव्हती, त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासत आहे, असा आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे कोरोनाग्रस्तांचं प्रमाण वाढल्याचंही ते म्हणाले.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र आणि देशासाठी सीरमच्या अदर पुनावाला यांनी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती. लसीचा प्लांट आपल्या पुण्यात असल्याने आपल्या इथं अधिक लस कशी मिळेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुण्यात विधान भवन इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत अनेक प्रश्नांवर त्यांनी भूमिका मांडली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाविरोधातील लढाईत चीनचा भारताला मदतीचा प्रस्ताव

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळे निधन